Share

वाढत्या इंधन दरवाढीवर अखेर ‘अमूल’ ची खास चपराक; ‘या’ टॉपिकलची होतेय चर्चा

Published On: 

मुंबई : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

दरम्यान, देशातील घडामोडींवर ‘अमूल’ समूह टॉपिकलद्वारे भाष्य करत असतं. क्रिकेट मधील हार-जीत, एखाद्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी, देशाचे शूर जवान असो वा संशोधन अशा सर्वच घटनांना अमूल विविध टॉपिकल्सद्वारे खास पद्धतीने मांडत असते. २०१३ साली केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना मोठी इंधन दरवाढ झाली होती. यावेळी अमूलने विविध टॉपिकल्स मधून सरकारवर निशाणा साधला होता. ‘गड्डी रुला रही हैं ?’ हे टॉपिकल चांगलच गाजलं होतं.

आता विक्रमी इंधनांमध्ये दररोज विक्रमी दरवाढ होत असून पेट्रोलने शंभरी गाठली असताना अमूल गप्प का आहे ? असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला होता. पेट्रोल शंभरी जवळ असून आता अमूल कधी भाष्य करणार याची प्रतीक्षा असल्याचे ट्विटस करण्यात येत होते. अखेर अमूलने वाढत्या इंधन दरवाढीवर टॉपिकल तयार करून केंद्र सरकारला चपराक लगावली आहे. ‘वेदनादायी दरवाढ’ असं भाष्य अमूलने केलं आहे. दरम्यान, मुंबईत आज पेट्रोल ९७ रुपये प्रति लिटर तर दिल्लीत 90.58 रुपये प्रति लिटर इतकं झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!