🕒 1 min read
ठाणे : ‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान केलंय राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी. मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी ‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है’, असे; वादग्रस्त विधान केलं. ‘ २०११ में अल्लाह को मालूम था, कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में २०१९ में कब्रस्तान बना’, अशी मुक्ताफळे आव्हाड यांनी उधळली आहेत. तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवले आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचा सूर राज्यभर उमटत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- परभणीत ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
- दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
