🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला. त्यामुळे सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरु आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं उदाहरण देखील दिलं आहे.
ठाकरे यांचं नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेला मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. जर तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा, मात्र, अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणं चुकीचं असल्याचं सुप्रिया सुळेंनी यावेळी म्हटलं आहे.
यादरम्यान, सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि अजित पवार यांचं उदाहरण दिलं आहे. शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळेस साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढून उभे राहिले त्यावेळेस त्यांनी काँग्रेस माझी आहे, त्यातील माणसं माझी आहे असे म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील असं सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उदघटनाला सुप्रिया सुळेंनी अहमदनगर उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं असून ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद पेटला! सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का
- Sudhir Mungantiwar | वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – सुधीर मुनगंटीवार
- “तानाजी सावंत म्हणाले होते, महाराष्ट्राला भिकारी बनवेल पण…”, राहुल मोटेंनी केले अनेक खुलासे
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना ‘ती’ एक चूक महागात पडणार? ; शिंदे गटाच्या वकिलांचा महत्वाचा युक्तिवाद!
- Health Tips | तुमच्या हाताची बोट दुखत असतील तर करा ‘ हे ‘ उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
