Share

Anil Desai | शिवसेनेच्या निकालावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

मुंबई : शिवसेना नेमकी कोणाची या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी मिळाली असून पक्ष आणि चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. यावर शिवसेना नेता अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देसाई यांची प्रतिक्रियाः

यादरम्यान, आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार असून निवडणूक आयोगाची सगळी प्रक्रीया पुर्ण करू, असं अनिल देसाई म्हणाले आहेत. तसेच हा धक्का नाही तर प्रक्रीयेचा एक भाग असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाला देणार पुरावेः

आतापर्यंत आम्ही त्यांची प्रक्रीया पुर्ण करत आलो आहोत तरी निवडणूक आयोग सांगेल त्या पद्धतीने आम्ही पुरावे देऊ, अशी सहकार्याची भूमिका अनिल देसाईंनी दिली आहे. आम्हाला पुढच्या सुनावणीत नक्की न्याय मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड करुन उद्धव ठाकरे यांना झटका दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एवढ्यावरच एकनाथ शिंदे शांत न राहता त्यांनी थेट पक्षावरचं म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला. त्यामुळे हा वाद कोर्टात गेला असून शिवसेना नेमकी कोणाची यावर सुनावणी सुरु आहे. आता याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!