मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. त्यांचे गाणे असो वा एखाद्या विषयावर ट्विटरद्वारे त्यांनी प्रकट केलेले विचार, नेटकऱ्यांसह अनेक चर्चांमध्येही त्यांच्यावर टीका केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील ती सल काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.
काही दिवसांपूर्वीच ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. या गाण्यावर अक्षरशः डिसलाईक्सचा वर्षाव करण्यात आला होता. या गाण्याचा आशय चांगला असला तरी राजकीय विरोधाने ट्रोल केलं जातं असं देखील त्या म्हणाल्या. आता, 17 डिसेंबर त्यांचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी दिली आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ट्रोलर्सना प्रत्युत्तर!
‘कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे माझ्या आयुष्यातलेच चढ उतारांचे भाग आहेत आणि हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. मी लहानपणापासून गाणं शिकत आहे. त्यामुळे मला माझ्या क्षमता माहित आहेत. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला माहित आहे.’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- मनसे सोबत आली तर वाईट काय?; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ची पाणीपट्टी थकीत? बीएमसीने केला खुलासा
- दानवेंची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक!
- …अन अजितदादांना आठवले ‘ते’ दिवस? फडणवीसांना म्हणाले मुख्यमंत्री!
- फर्ग्युसन महाविद्यालयात ‘लॅबोरेटरी शुल्क’ विरोधात अभाविपचे आक्रमक आंदोलन


