Share

अमृता फडणवीस यांनी आमच्यासमोर येऊन बोलावं; शिवसेनेचं खुलं आव्हान

Published On: 

मुंबई : माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून दिलं.

यावर, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आता, शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ‘नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकारणाशी संबंध आलेल्या अमृता फडणवीसांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेची ही चौथी पिढी आहे जी हिंदुत्वावादी आहे. आमदार, खासदार, नगरसेवक वा प्रवक्त्या असत्या तर आम्ही ऐकून घेतलं असतं. आमचं तोंड त्यांनी उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. मात्र आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. जर बोलायचंच असेल तर आमच्या समोर येऊन बोलावं,’ असं खुलं आव्हान शिवसेना महिला आघाडी तर्फे नेत्या विशाखा राऊत यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!