Share

अमरावती हिंसाचार पूर्वनियोजित, ‘त्या’ मोर्चाची चौकशी करा; फडणवीसांची मागणी

Published On: 

अमरावती : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात काही भागात पडले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराची झालेल्या भागाची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून पोलीस आणि प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावे असेही फडणवीस म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यभरात एकाच दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती, असेही फडणवीस यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

अमरावतीसह राज्यातील इतर ठिकाणी काढण्यात आलेले मोर्चे हे खोट्या माहितीच्या आधारे काढण्यात आले होते. त्रिपुरात जी घटना घडली नाही, त्याचे खोट्या माहितीच्या आधारे भांडवल करण्यात आले. याच खोट्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. राज्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्वनियोजनाशिवाय मोर्चे निघू शकत नाहीत. त्यामुळेच 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चांची चौकशी करावी. सध्या सुरू असलेली कारवाई 13 नोव्हेंबरच्या घटनेवर आधारीत होत आहे. पण दंगल घडवण्याच्या हेतूने 12 तारखेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!