मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दारुच्या एक्साईज ड्युटीत १५० टक्क्यांनी कमी केली आहे. शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. असे राज्य सरकारने म्हंटले आहे.
यावर भाजपा आमदार अशिष शेलार ट्विट करत म्हणाले, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी मागणी आम्ही केली. पण ते ठाकरे सरकारला ऐकायलाच गेले नाही. मात्र, आता विदेशी दारुच्या किंमती ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. पब, पार्टी आणि पेग. गुड गोईंग!
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी मागणी आम्ही केली. पण ते ठाकरे सरकारला ऐकायलाच गेले नाही…
मात्र,आता विदेशी दारुच्या किंमती 50% कमी करण्याचा निर्णय घेतला.
पब, पार्टी आणि पेग.. गुड गोईंग!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 21, 2021
राज्य सरकारने स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्च ३०० वरून १५० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. राज्य सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- असला सैतान मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही- सदाभाऊ खोत
- ‘ही तर मद्य विकास आघाडी’; दारू स्वस्त करण्यावर भाजपची टीका
- ‘आघाडीचा अजब कारभार, हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’
- एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पोलिसांकडून दडपले जातेय; अतुल भातखळकर
- पीएम केअर फंडातून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मदत करा- संजय राऊत


