🕒 1 min read
अमरावती: राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी १२ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र प्रशासनाने रात्रीतून पुतळा काढल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान काल (९ फेब्रुवारी) काही महिलांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई (Ink thrown on Municipal Commissioner Praveen Ashtikar)फेकल्यामुळे हा वाद अजूनच चिघळला आहे. याप्रकरणी आमदार रवी राणांसह (MLA Ravi Rana)दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यावरच आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“अंडर बायपास मध्ये पाणी साचत असल्याने ते पाहणी करण्यासाठी मला एका कंत्राटदाराचे ९ फोन आले. तसेच आमदार येत आहे असे मला सांगण्यात आले. त्यामुळे याभागाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, दोन महिला धावून आल्या आणि त्यांनी शाईफेक करून मला धक्काबुकी केली”, असा आरोप प्रवीण आष्टीकर यांनी केला आहे.
तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी आष्टीकर यांनी पैसे देऊन अमरावतीत पोस्टिंग घेतली आणि दोन महिन्यांत ४ ते ५ कोटी रुपये ३ टक्के कमिशन घेत कंत्राटदारांकडून कमावले असल्याचा आरप केला आहे. त्यामुळे आष्टीकर यांनी चमचेगिरी करु नये असा टोलाही रवी राणा यांनी लगावला आहे. दरम्यान दरम्यान आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक करणाऱ्या महिला खासदार नवनीत राणांच्या (MP Navneet Rana) कार्यकर्त्या असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अजूनच चिघळले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
राहुल गांधींच्या टीकेवर पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले,‘जे सभागृहात बसतच…’
-
“सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेसकडे बोट दाखविणार का?”
-
UP Assembly Election 2022 : पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात
-
मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
