🕒 1 min read
उत्तर प्रदेश: यूपी विधानसभा निवडणुक मतदानाचा (UP Assembly Election 2022) आज पहिला टप्पा सुरु झाला आहे. आज यूपीतील ५८ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी सात वाजेपासूनच मतदानास सुरुवात झाली आहे.
दरम्यान मतदानाच्या पहिल्याच दिवशी EVM मशीनमध्ये खराबी झाल्याचे समोर आले आहे. मथुरा येथील बलदेव विधानसभा क्षेत्रातील फरह येथे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. बुथ क्रमांक ४४२ वर ईव्हीएम मशिन खराब झाल्याने मतदान थांबले आहे. तर मुजफ्फरनगरच्या इस्लामिया इंटर कॉलेज पोलींग बुथावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान आज मेरठ येथील ७ जागांसाठी मतदान होणार असून या भागात २६ लाख मतदार आहेत. काही भागात स्वतः उमेदवार उपस्थित राहुन माध्यमांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर उत्साह दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेसकडे बोट दाखविणार का?”
-
अनिल देशमुखांनी दिली कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; सचिन वाझेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
