मुंबई : महाराष्ट्राचे सद्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून अधिक चर्चेत आले आहेत. सरकारशी विसंगत भूमिकांमुळे त्यांच्यावर टीका देखील केली गेली. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यापासून ते प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रापर्यंत, त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते टीकेचे धनी बनले.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कोश्यारींनी ठाकरेंना लिहिलेल्या पात्राबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता, कोश्यारींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी कोश्यारींना अवमानाची नोटीस पाठवण्यात आली असून थकबाकी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर, चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे हे प्रकरण ?
रुरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने (रूलक) उत्तराखंड हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी सुविधांच्या लाभापोटीचं भाडे सहा महिन्यात जमा करण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने त्यानुसार कोश्यारींना भाडे भरण्याचे आदेश दिले होते. मात्र हे भाडे जमा न केल्याने, मंगळवारी कोर्टाने कोश्यारींविरोधात अवमानाची नोटीस धाडली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी 47 लाख 57 हजार 758 रुपये थकवल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
राष्ट्रपती वा राज्यपालांविरोधात कोणतीही याचिका न्यायालयात दाखल करण्यापूर्वी दोन महिने आधी त्यांना नोटीस देणे आवश्यक असते. १० ऑक्टोबर रोजी भगतसिंह कोश्यारी याना बजावलेल्या नोटिसीला २ महिने पूर्ण झाल्यानंतरच याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याचं देखील सांगितलं आहे. आता कोश्यारी काय उत्तर देणार हे महत्वाचं आहे?
महत्वाच्या बातम्या-
- ‘मी या वयात इतकं फिरतोय, तू किमान बाहेर तरी पड…’ असं पवारांना म्हणायचं असेल : पाटील
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दारुडा माणूस – प्रकाश आंबेडकर
- श्री तुळजाभवानी देवीची आज रथ अलंकाराने महापूजा
- कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आला तर त्याला दांडक्याने सोलून काढा – सदाभाऊ खोत
- ठाकरेंचा कोरडा प्रवास उपयोगाचा नाही, थेट निर्णय घेऊन मदत करा : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

