Share

ICC ODI rankings: ‘या’ पाकिस्तानी फलंदाजाने विराटला दिला मोठा झटका, वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली खराब फॉर्ममुळे सतत चर्चेत आहे. भारतीय संघासाठी विराटला धावा करता न आल्याने तो तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खाली घसरत आहे. आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानच्या फलंदाजाने कोलीला खाली ढकलत दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे.

आयसीसीने बुधवारी आपली ताजी क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार पाकिस्तानने आता वनडे फलंदाजीत पहिले आणि दुसरे स्थान पटकावले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याआधीच पहिल्या स्थानावर होता. तर आता इमाम-उल-हक दुसरा क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाला आहे. यापूर्वी ही जागा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होती. बाबर ८९२ गुणांसह पहिला तर इमाम ८१५ गुणांसह दुसरा आला आहे. भारताचा फलंदाज कोहली ८११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा ७९१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडचा टेंट बोल्ट ७२६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड ६९१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा हेन्री निकोलस असुन त्याच्या खात्यात एकूण ६८३ गुण आहेत. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी ६८१ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा जसप्रीत बुमराह ६७९ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

मागील तीन वर्षात विराट कोहली ने कोणत्या ही क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये शतक झळकावले नाही. विराट सध्या त्याच्या खराब कामगिरीतून जात आहे. आयपीएल मध्ये खेळताना विराट ला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब कामगिरीचा फटका त्याला जाणवत आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय रँकिंगमध्ये विराटची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. याबाबतीत सध्या भारताच्या खेळाडूंना मागे सोडत पाकिस्तानचे खेळाडू वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!