रत्नागिरी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कोश्यारी करतील.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर जलमय झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी चिपळूण दौरा केला. त्यानंतर आता राज्यपालही चिपळूणला जात आहेत. त्यासोबतच दरड कोसळून गिळंकृत झालेल्या तळीये गावाचीही पाहणी कोश्यारी करणार आहेत.अतिवृष्टीमुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळीये गावात आतापर्यंत 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची नितांत गरज निर्माण झाली आहे.
राज्यपाल कोश्यारीसोबत भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनाही पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. या दौऱ्यासाठी आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोबत प्रस्थान केले आहे. मात्र आता शेलार यांचे राज्यपालांच्या सोबत जाणे राष्ट्रवादीला खटकले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या दौऱ्यावर काहीअंशी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावे. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?? तुम्ही राज्याचे आहात की भाजपा चे ते तरी सांगुन टाका एकदा असं मिटकरी यांनी म्हटले आहे. महामहिम राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल नसून भाजपाचे अधिकृत नेते आहेत हे त्यांनीच स्वतः आज सिद्ध केले. लोकनेते आशिष शेलार यांना सोबत नेणे हे शिष्टाचाराला धरून आहे का. महाराष्ट्राने यांना जाब विचारायला हवा असं मिटकरी यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
