🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत त्यांनी भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन केले. त्यात एक मोठी घडामोड म्हणजे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.तसेच राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला तर आम्हाला वाटत होतं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, पण आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. असेही दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार असून ही भेट राजकीय असणार नाही असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. तक्रार आल्यावरच त्या कारवाई करतात. त्यामुळे ती कोणालाही लागू शकते. घाबरण्याचं त्यात काय कारण? असा सवाल करत त्यांनी मविआ नेत्यांवरही निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
“भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
“राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?”; आव्हाडांचा सवाल
“राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” – गुलाबराव पाटील आक्रमक
नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
