Share

VIDEO : करियरच्या शेवटच्या मॅचमध्ये रॉस टेलरला अश्रू अनावर; रडता रडता सोडलं मैदान!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर नेदरलँड्सविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. टेलर त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यापूर्वी रडताना दिसला, हॅमिल्टनमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या वनडेपूर्वी राष्ट्रगीतादरम्यान तो भावूक झाला.

यावेळी टेलरसोबत त्याची पत्नी आणि मुलेही उपस्थित होती. स्टार किवी फलंदाज टेलरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवृत्ती जाहीर केली होती. आता त्याच्या शेवटच्या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/sparknzsport/status/1510802020974088192

न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांची मालिका आधीच जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टेलर देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. टेलरने तीनही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी १०० सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरने न्यूझीलंडकडून ११२ कसोटी सामन्यांमध्ये ७६८३ धावा केल्या. ज्यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २३५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८५९३ धावा केल्या ज्यात २१ शतके आणि ५१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १०२ टी-२० सामन्यात १९०९ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याच्या नावावर ७ अर्धशतके आहेत. भारताला पराभूत करून कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनलेल्या न्यूझीलंड संघाचा टेलर देखील एक भाग होता. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत विजयी धावा केल्या. टेलरने त्याच वेळी बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

महत्त्वाचा बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!