🕒 1 min read
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी मनात घर केलं. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते खासदार झाले. सामान्य व्यक्तीच्या प्रश्नांची जाण असलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे. आता नेता की, अभिनेता त्यांनी दुहेरी भूमिका घेतली आहे.
अभिनय अन् राजकारण या दोन्ही ठिकाणी आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटविणारे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी राजकारण आणि अभिनय यांची सांगड घालण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतची आपली भूमिका त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केली आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या त्यांच्या निर्णयामुळे अमोल कोल्हे सोशल मिडियावरही दुहेरी भूमिकातून नेटकऱ्यांना भेटणार आहेत.
‘अभिनेता कि नेता’ याविषयावर डॉ. अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकारणासाठी फेसबूक तर अभिनयासाठी इंस्टाग्रामची त्यांनी निवड केली आहे. याबाबतचा निर्णय त्यांनी इंन्स्टाग्रामवर जाहीर केला आहे. अमोल कोल्हे यांनी इंन्स्टाग्रामवर याबाबतची पोस्टही शेअर केली आहे.
https://www.instagram.com/p/CVhVYUmNfkU/?utm_medium=copy_link
‘इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्टवर प्रतिक्रिया देताना “अभिनेता” की “नेता”अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच मी एक निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे कन्फ्युजन नको. राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना ?”
जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये. अभिनय आणि राजकारणात गल्लत करु नका…, अशी तळटीपही इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या खाली कोल्हे यांनी लिहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मला अडीच वर्षे जेलमध्ये ठेवलं तेव्हा कुठे होता मराठी माणूस?; भुजबळांचा भाजपला सवाल
- ‘शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या तुषार भोसलेची गाढवावरून धिंड काढणार’, राष्ट्रवादीचा इशारा
- ‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही- नवाब मलिक
- भाजपचं पितळ उघडं पाडण्याच्या भाषेऐवजी करा ना काय करायचे ते; चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
