Share

“पिढ्या बदलत गेल्या, मनोरंजनाची नवनवीन साधनं आली तरी…”, अमोल कोल्हे यांनी शेअर केला व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाकडून  धार्मिक तेढ निर्माण करून राज्यातील कायदा-व्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे मविआ सरकारने म्हटले आहे. मात्र अशा संघर्षात राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी गावाकडील जत्रेचा व्हिडिओ शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. एकीकडे धार्मिक मुद्द्यावरून संघर्ष सुरु असताना गावाकडील जत्रेचा हा माहोल विरोधाभास निर्माण करतो.

“नारायणगावचे ग्रामदैवत आई मुक्ताबाई आणि काळोबा देवाचा जत्रोत्सव! लहानपणापासून हा जत्रोत्सव माझ्यासाठी श्रद्धेचा, आकर्षणाचा आणि अभिमानाचा विषय आहे. मंदिरातील आरास, भक्तिमय वातावरण, बाहेरच्या पटांगणातील पाळणे, शेव रेवडी-जिलेबीवर मारलेला ताव, नेत्रदीपक शोभेचे दारूकाम, तमाशा पंढरीतील तमाशा, आखाड्यात रंगणाऱ्या कुस्त्या… पिढ्या बदलत गेल्या, मनोरंजनाची नवनवीन साधनं आली तरी गावच्या जत्रोत्सवाची सर ना कुठल्या माॅलला ना अम्युझमेंट पार्कला!”, असे ट्वीट अमोल कोल्हे यांनी केले आहे.

तसेच ग्रामीण अर्थकारणाला गतिमान करणारं आणि त्याचवेळी मातीशी नाळ घट्ट करणारं हे या जत्रोत्सवाचं समीकरण स्तिमित करणारं असल्याचेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!