🕒 1 min read
मुंबई: सर्वाधिक GST संकलन करणारे राज्य म्हणून जसा महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो, तसेच पेट्रोल-डिझेल वर सर्वाधिक कर आकारून नागरिकांची लूट करणारे राज्य म्हणूनही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. नागरिकांना स्पष्टीकरण देण्याच्या आविर्भावात मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात मात्र, पंतप्रधानांची, केंद्र सरकारची आणि नागरिकांचीही दिशाभूल केली आहे. असा आरोप भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत केला आहे.
मुळात GST परताव्याचा २६ हजार कोटींचा आकडा ही मुख्यमंत्र्यांची लोणकढी थाप आहे. यापैकी १३ हजार कोटींहून अधिक रक्कम परताव्यापोटी राज्याला मिळालेली असून उर्वरित १३ हजार कोटी येत्या जुलैपर्यंत मिळणारच आहेत. मागील पाच वर्षांत केवळ जीएसटी परतावाच नव्हे, तर राज्यावरील प्रत्येक संकटात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरभरून मदत मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर ७०० कोटीचा निधी केंद्राकडून मिळाल्याचे विस्मरण मुख्यमंत्र्यांना झाले आहे काय? असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी अनावश्यक वाद उभा करून पंतप्रधानांना बेजबाबदार प्रत्युत्तरेदेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीजबाबदारीचे भान ठेवावे, एवढेच आवाहन आहे. #GST #PetrolDieselPrice #VAT #maharashtra #UddhavThackeray #NarendraModi #जीएसटी #पेट्रोल_डीजल 5/5
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 28, 2022
मुख्य म्हणजे, पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले असताना जीएसटीचा अनावश्यक व निरर्थक मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री नागरिकांची व देशाची दिशाभूल करत आहेत. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी अनावश्यक वाद उभा करून पंतप्रधानांना बेजबाबदार प्रत्युत्तरे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे, एवढेच आवाहन आहे. असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “१९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच…”- गोपीचंद पडळकर आक्रमक
- पंतप्रधान मोदींच्या बैठकीवरुन संजय राऊतांची टीका; म्हणाले…
- महाराष्ट्र दिनाला दोन ठाकरेंची रंगणार जुगलबंदी; उद्धव ठाकरे घेणार पुण्यात सभा
- Uttar Pradesh : योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वाक्यांचा परिणाम; ११ हजार भोंग्यांचा आवाज झाला बंद
- राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार! पण ‘या’ असणार अटी आणि शर्थी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
