🕒 1 min read
भुसावळ : “मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऑफर येत आहेत, परंतु मी भारतीय जनता पक्ष कधीही सोडणार नाही. कारण देशाच्या सुरक्षेसाठी भाजप पक्ष गरजेचं आहे,” असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले आहे. सिंध कॉलनीतील प्रभाग क्रमांक २१ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला भेट दिली असता, यावेळी त्यांनी आपली ही भावना बोलवून दाखवली. भुसावळ मधील सिंध कॉलनीत रामभाऊ बेकारीपासून ते भक्त निवासपर्यंत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा आरंभ आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडला.
आमदार संजय सावकारे म्हणाले, प्रभाग क्रमांक २१ मध्ये खूप कामे झाली आहेत. काही कामे अजून बाकी आहेत . राहिलेली कामेही लवकरच पूर्ण करू. कोणत्याही परिस्थितीत प्रभागाला निधीची टंचाई भासू देणार नाही. सिंध कॉलनीतील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. सिंध समाज हा भाजपचा कायम मतदार असून, आज मात्र देशाच्या सुरक्षेसाठी भाजपच पाहिजे. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खूप ऑफर येत आहेत, पण मी भाजप सोडणार नाही.
माझी नगरसेवक निकी बतरा आणि अजय नागरानी हे बरीच कामे स्वतःच्या खर्चातून करत आहेत, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही या दोघांनाही निवडून द्यावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी सिंध कॉलनीतील नागरिकांना केले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
