टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली होती.
यावर अमोल कोल्हे यांनी औरंगजेबाला त्याच्या संपूर्ण हयातीत एकही किल्ला घेता आला नव्हता, परंतु या भाजप सरकारने पाच वर्षांत २५ किल्ले रिसोर्ट आणि लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच आहे. शिवाय गडकिल्ले राखण्यासाठी जीवाचं बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या बलिदानाचा अपमान केला आहे असं विधान केले होते.
याविषयी बोलताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी अमोल कोल्हे काहीही बोलतात त्यांनी पुरावे द्यावे नाहीतर राजीनामा द्यावा असं विधान केले होते. याविषयी बोलताना अमोल कोल्हे यांनी ‘ मी पुरावे दिले आहेत. आता रावल साहेब तुम्हीच राजीनामा कधी देताय ते सांगा असं विधान केले आहे. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे.
सन्माननीय जयकुमार रावल साहेब…
पुरावे दिलेत आता राजीनामा कधी देताय…?@NCPspeaks pic.twitter.com/9lnNpSAaXK— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 11, 2019
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याविषयी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज झाला आहे असं त्यांनी म्हटले आहे.
- पिरंगुटजवळ भरधाव ट्रकने ५ जणांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू
- ‘गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला हाणून पाडण्याची वेळ आपण आणायची’
- कॉंग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग,सपा-बसपाची स्वतंत्र आघाडी


