Share

‘गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला हाणून पाडण्याची वेळ आपण आणायची’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे ही यात्रा आली होती होती. यावेळी झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

रुपाली चाकणकर यांनी सभेला संबोधित करताना ‘१६ हजार शेतकऱ्यांचा जीव या सरकारने घेतला आहे. आता यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का? या गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला हाणून पाडण्याची वेळ आपण आणायची आहे. ग्रामपंचायतीत निवडून न येणारी माणसे आज मंत्री झाले आहेत. ज्या झाडेने आपल्याला सावली दिली त्याच झाडाच्या मुळावर उठाणाऱ्या लोकांना जनता कधीच माफ करणार नाही असं विधान केले आहे.

दरम्यान, याच सभेला संबोधित करताना अमोल कोल्हे यांनी ‘या सरकारची २०१४ सालची सगळी आश्वासनं आठवा. या सरकारने आजपर्यंत जे काही केले त्याचा सर्व लेखाजोखा जनतेपुढे मांडण्याची गरज आहे. ५४ वर्षांचे कर्ज हे २ लाख कोटी आणि या सरकारने पाच वर्षांत पाच लाख कोटी कर्ज करुन ठेवले आहे. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी या सरकारची अवस्था आहे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपा-शिवसेनेचे सरकार महाराष्ट्राचा इतिहास पुसायला निघालं आहे. असल्या लोकांचे अस्तित्व पुसून टाकण्याची जबाबदारी आपली आहे असं विधान केले आहे. या सभेला जयंत पाटील, अनिल देशमुख, रमेश बंग, मेहबूब शेख, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!