टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत. या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचाही समावेश आहे. या यात्रेतील गेवराई येथील सभेत रुपाली चाकणकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सभेला संबोधित करताना ‘काल बीडमध्ये एका महिलेवर बलात्कार झालाय. हे आपले दुर्दैव आहे. हे सरकार आम्हाला विचारत तुम्ही ७० वर्षात काय केलं. तुम्हाला पोलिओचे डोस नसते पाजले तर तुम्ही वेडेवाकडे जन्माला आला असता’ अशी टीका सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
तसेच पुढे बोलताना ‘या भागात दारुचे अड्डे आहेत यातून अनेक महिलांचा संसार उद्ध्वस्त होत आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री याकडे का लक्ष देत नाहीत यावर विचार करणे आपले कर्तव्य आहे. शिवस्वराज्य यात्रेला मिळणारा हा प्रतिसाद मुख्यमंत्र्यांना दाखवण्याची गरज आहे असंही विधान रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
दरम्यान, या सभेत अमोल कोल्हे यांनी महाजनादेश यात्रेवर टीका करताना ‘आज अनेक यात्रा निघत आहेत पण मुख्यमंत्री पोलिसांचं कडं घेऊन फिरत आहेत आणि एक आपली यात्रा जिथे पोलिसांचं कडं नसून महाराष्ट्राचा मावळा यात्रेत सामिल झालेला असतो. मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरायची भीती वाटते. अशा शब्दात महाजनादेश यात्रेवर टीका केली आहे.
- भाजपच्या महाजनादेश यात्रेत उस्मानाबाद जिल्हयात होणार राजकिय भुकंप ?
- ‘भगव्या रंगावर कुणाची मक्तेदारी नाही, मग आम्ही वापरला त्यात गैर काय’
- ‘या’ दिवशी मुख्यमंत्री लिंगायत आरक्षणाचा निर्णय जाहीर करतील, शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट
- यूएईचा सर्वोच्च मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ने मोदींचा होणार सन्मान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

