औरंगाबादः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे अंबादास दानवे बहुमतांनी विजयी झाले. या विजयाने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवनियुक्त आमदार अंबादास दानवे यांच्या नेतुत्वाखाली तीन वर्षापासून शहरातून भव्य कावड यात्रा काढण्यात येते. येत्या 27 ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता ही विश्वविक्रमी कावड यात्रा निघणार आहे.
श्रावण मासानिमित्त शिवसेनेकडून कावड यात्रा काढली जाते. गेल्या वर्षी 501 फुटांची कावड घेऊन ही यात्रा काढण्यात आल्यामुळे याची नोंद वर्ल्ड ग्रुप ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. यंदा देखील विश्वविक्रमी नामांकन प्राप्त कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 27) हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदीराजवळील पवित्र कुंडातून जल कलश भरून खडकेश्वर महादेवाला पर्जन्यवृष्टीसाठी जलाभिषेक करण्यात येणार आहे.
हरसिद्धि माता मंदिरापासून या कावड यात्रेचा प्रारंभ होऊन टीव्ही सेंटर- गणेश कॉलनी- चेलीपुरा- गांधी पुतळा- सराफा- सिटी चौक -मछली खडक- गुलमंडी – संभाजी पेठ- नागेश्वरवाडी येथून खडकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कावड यात्रा पोहचेल. कावड यात्रेत समस्त हिंदू बांधव शिवभक्त यांनी विराट संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंयोजक दयाराम बसैये यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश
नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

