मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सोबत आरपीआय युती करेल. भाजप आरपीआय च्या युतीचा मुंबई महापालिकेत विजय नक्की होईल त्यात भाजपचा महापौर तर आरपीआय चा उपमहापौर निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
Republican Party of India (RPI) is with BJP. Fadnavis ji has said that BJP will come to power but they still need our support. This time the BJP-RPI flags will unfurl on BMC. Shiv Sena needs a jolt right now. There'll be a BJP Mayor & RPI Deputy Mayor: Ramdas Athawale, RPI chief pic.twitter.com/zAnlEhxS9A
— ANI (@ANI) November 22, 2020
आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपआपल्या पद्धतीने कार्यरत झाले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा प्रमुख सामना मुंबई महापालिका निवडणुकीत होणार असुन त्यात आरपीआय ची भीमशक्ती ज्यांच्या बाजूने त्यांचा विजय निश्चित असल्याने रिपब्लिकन पक्ष भाजपला समर्थन देणार आहे. त्यासाठी लवकरच आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत पुन्हा कोरोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण भाजपचे आहे; राऊतांची रोखठोक टीका
- मोठी बातमी : EWS प्रवेशाबाबत मराठा समाजाला न्यायालयाचा दिलासा
- ‘शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते’ : चंद्रकांत पाटील
- निवडणुकीआधीच तृणमूलचे पाच खासदार भाजपाच्या वाटेवर? भाजप खासदाराचा दावा !
- ‘तोरबाज’ चित्रपटात संजय दत्त दिसणार ‘मसीहा’च्या भूमिकेत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

