🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Kill Gandhi या चित्रपटात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरुन मोठे वादंग उठले आहे. आता संभाजी ब्रिगेड संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. नथुरामप्रेमी अमोल कोल्हेंनी विचारांशी गद्दारी केली आहे, चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेने केली आहे.
अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांनी विरोध केला आहे. तर एक अभिनेता म्हणून नथूरामची भूमिका करण्यात काय गैर आहे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या सर्व गोंधळात अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड टीका होत असून वेगवेगळे आरोप केले जात आहे. आता तर संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली आहे, असा आरोप करत चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
अमोल कोल्हे यांनी Why I Kill Gandhi या हिंदी चित्रपटात महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याचा अभिनय केला आहे. या चित्रपटात नथुरामचे उदात्तीकरण केले जात आहे. या कारणामुळे संभाजी ब्रिगेडने डॉ. अमोल कोल्हेंविरोधात कठोर भूमिका घेतली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. “आम्हाला नथुराम नकोय. नथुरामप्रेमी डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी गद्दारी केली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा Why I Kill Gandhi हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये. त्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी. आम्हाला नथुराम नकोय,” असे संतोष शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचे आयुष्य म्हणजे कृतींनी गजबजलेले मनोहारी नाट्य- संजय राऊत
- “ही परिस्थिती १९९४ सारखीच, तेव्हा माझ्या वडिलांना…”; उत्पल पर्रीकरांची धक्कादायक माहिती
- Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
- सलमानचा पगडी बांधलेला लूक अन् प्रज्ञा जैस्वालच्या रोमान्सचा तडका, ‘मैं चला’ गाणं व्हायरल
- “हायकमांडने झापल्यानंतर नाना पटोलेंनी कथित ‘मोदी’ तयार केला”; भाजप खासदाराचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
