Share

अमिताभ यांनी वडिलांच्या कवितांचे रेकॉर्डिंग करत असल्याची दिली माहिती

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकांचे आवडते हिरो आहेत. १९ व्या शतकापासून त्यांनी मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या ते सोशल मिडीयावर अधिक सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. सोशल मिडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

नुकतंच बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर दोन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बी यांचे दिवंगत पिता हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेल्या कविता आपल्या आवाजात रेकॉर्ड करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे दोन फोटोज शेअर केले आहेत.  फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की,  ‘पूज्य बाबूजींच्या लेखनापासून स्वतःला दूर ठेवता येत नाही…आणि आता त्यांचं उच्चारण, स्वतःच्या आवाजात…’,  असं त्यांनी लिहत वडिलांच्या कविता रेकॉर्ड करत असल्याची माहिती दिली आहे.

अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ आणि ‘झुंड’  हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!