मुंबई : जगभरात नवीन वर्षाचे (Happy New Year 2022) स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. सर्व सामान्यांसह बॉलिवूडमधील (Bollywood) काही कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर त्यांचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील प्रचंड प्रमाणात लाईक्स, कमेंट केली आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ते सतत पोस्ट शेअर करतात आणि ब्लॉगही लिहित असतात. नुकतच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कॅप्शनमध्ये फक्त नवीन वर्षाची तारीख म्हणजेच ‘१.१.२२’ लिहिली आहे आणि हार्ट इमोजी शेअर केला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अमिताभ यांनी डोळे मिटलेले दिसत आहेत. मिटलेल्या डोळयावर चष्मा आणि कानात हेडफोन लावून बिनधास्त दिसत आहेत. हा फोटो पाहून चाहत्यांसह सेलिब्रिटींनी फोटोंवर भरपूर लाईक्स, कमेंट करत आहेत. चाहत्यांनी त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या.
https://www.instagram.com/p/CYLJd_SB1Rw/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान काही दिवसांपूर्वी तो KBC13 हा रिअलिटी गेम शोचे १००० भाग पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला आणि ते खूप भावूकही झाले होते. वयाच्या ७९ व्या वर्षीही अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. ते सध्या काही चित्रपटांचे शूटिंगही करत असून रणबीर कपूर, आलिया भट्टसोबत अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये झळकणार आहे. गतवर्षी ते ‘चेहरे’ या चित्रपटात दिसले होते.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिम जोरदार चर्चा
- ‘बळीराजाचा विकास आणि उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध’
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

