Share

अमिताभ बच्चन यांनी वडिलोपार्जित ‘सोपान’ बंगला २३ कोटीला विकला

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सतत चर्चेत असतात. आता त्यांनी त्यांचं दिल्ली येथील वडिलोपार्जित घर विकल्याची माहिती समोर आली आहे. आता या घराला आलेली किंमती ऐकून नक्कीच धक्का बसेल.

दरम्यान घराबद्दल अमिताभ बच्चन यांच्या आठवणी सांगायचं झाल्यास त्यांनी दिल्ली येथील किरोरीमाल कॉलेजमधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. अमिताभ यांचे आई-वडील हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन (Harivansh Rai Bachchan and Teji Bachchan) दिल्लीमध्ये याच घरात बरीच वर्ष वास्तव्यास होते. त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतर करण्यापूर्वी याच घरात राहात होतं.

‘सोपान’ बंगला (‘Sopan’ bungalow) नेझिऑन ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ अवनी बडेर यांनी विकत घेतला असून त्या ३५ वर्षांपासून बच्चन कुटुंबीयांच्या परिचित आहेत. हे घर अमिताभ बच्चन यांनी त्यांना विकलं असून घराचा सौदा तब्बल २३ कोटींना झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ७ डिसेंबर २०२१ रोजी या बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतंच मुंबईतील त्यांचं एक घर भाड्याने दिलं आहे. लोखंडवाला रोडवरील अटलांटिस बिल्डिंगमधील ड्युप्लेक्स फ्लॅट त्यांनी अभिनेत्री क्रिती सनॉन हिला १० लाख रुपये महिना भाड्याने दोन वर्षांसाठी दिला आहे. तसेच अमिताभ बच्चन हे त्यांच्या कुटुंबासोबत सध्या जुहूमधील जलसा बंगल्यामध्ये राहात आहेत. त्यांनी हा बंगला निर्माते एन. सी. सिप्पी यांच्याकडून खरेदी केला होता. जुहू मॅरियॉटजवळ हा १० हजार १२५ चौरस फुटांच्या जागेत बंगला आहे. जुहूमध्येच अमिताभ बच्चन यांचा अजून एक प्रतीक्षा हा बंगला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!