Share

अमिताभ बच्चन यांनी मागितली ‘त्या’ महिलेची माफी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते वेगवेगळ्या पोस्ट मुळे नेहमीच चर्चेत असतात. मध्यंतरी अमिताभ बच्चन एका कवितेमुळे चर्चेत आले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केलेली एक कविता चोरीची असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला होता. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून अमिताभ बच्चन यांनी शेअर करताना त्याचे क्रेडिट दिले नाही, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

त्यानंतर टीशा यांनी बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी मत व्यक्त केलं होतं. या महिलेच्या तक्रारीनंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे या महिलेची माफी मागितली आहे. या कवितेचे मूळ कवी माहित नसल्यामुळे ही चूक झाल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट केलंय.

अमिताभ बच्चन ट्विट मध्ये म्हणाले, ‘या ट्विटचं श्रेय टीशा अग्रवाल यांनी दिलं पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला ठावूक नव्हतं. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटली त्यामुळे मी ती पोस्ट केली होती. मला माफ करा’
त्या महिलेची माफी मागितल्यानंतर सध्या महानायक अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!