Share

Bala Nandgaonkar | “माझ्यासाठी प्रति विठ्ठल राजसाहेब!” ; बाळा नांदगावकरांनी गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरेंचे घेतले आशिर्वाद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज गुरुपौर्णिमा आहे. अनेकजण आज आपल्या गुरुंना भेटी देतात. त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. राजकीय नेत्यांचे देखील गुरु असतात. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. तर मनसे पदाधिकारी बाळा नांदगावकर यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेत आशिर्वाद घेतले.

याबाबत बाळा नांदगावकर फेसबुकवर पोस्ट केली आहे. बाळा नांदगावकर म्हणाले, “भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल. नुकतीच आषाढी एकादशी झाली. लाखो लोक यानिमित्ताने पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन तृप्त होतात. विठ्ठल म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्याच्या केवळ दर्शनाने मन भरून येते. मी सुद्धा कायमच पंढरपूरला जाऊन विठू माऊली चरणी नतमस्तक होऊन तृप्त झालो आहे.”

“आज गुरुपौर्णिमा निमित्त माझ्यासाठी प्रति विठ्ठल असलेले राजसाहेब यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति माझे प्रेम व्यक्त केले. माझ्यासाठी गुरुपौर्णिमा हा मोठा दिवस व या दिवशी आपल्या गुरुची भेट म्हणजे दुग्धशर्करा योग. त्यांच्या या भेटीने मला जणू विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचे समाधान लाभले,” असे बाळा नांदगावकर म्हणाले.

https://www.facebook.com/MeBalaNandgaonkar/posts/pfbid02jTZHBqnrCdD2pBKg2RZbB4McUSnbvcPRdwYbzwkNFFcUPNnrnxN9xm8AJXAYAopPl

बाळा नांदगावकर कायम राज ठाकरे यांच्यासोबत असणारे नेते आहे. राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेत नांदगावकर असतात. बाळा नांदगावकर हे 1995 मध्ये माझगावमधून शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते, आणि 1999 आणि 2004 मध्ये ते पुन्हा विजयी झाले होते. ते 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर शिवडीमधून विधानसभेवर निवडून आले होते, परंतु 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!