🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचा आज ऐतिहासिक दसरा मेळावा होत आहे. यावेळी ही मेळावा दोन ठिकाणी होत आहे. एक उद्धव गटाकडून तर दुसरा एकनाथ शिंदे गटाचा. शिवाजी पार्कमध्ये उद्धव गटाचा मेळावा होत आहे. त्याचवेळी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात शिंदे गटाचा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आपली ताकद दाखवत आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी ऐकमेकांवर टीका केली. शिवाजी पार्कवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अमित शाहजी देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे गृहमंत्री आहेत, हे माहीत नाही. ते फक्त प्रत्येक राज्यात घुसतात आणि तिथे लढाई लावतात. ते मुंबईत येऊन गेले आणि शिवसेनेला जमीन दाखवू असे सांगितले. अमित शाह आम्ही जमीनीवरचे लोक आहोत. आम्हाला जमीन दाखवा पण आधी पीओकेची जमीन भारतात आणून दाखवा. चीन लडाखमधून अरुणाचलमध्ये दाखल झाला आहे. ती जमीन परत दाखवा.”
देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील केली टीका-
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. “देवेंद्र फडणविसांना कायद्याच कळतं…. मी टोमणा मारत नाही, तारिफ करतोय. जाताना म्हणाले, पुन्हा येईन, मग दीड दिवसासाठी आले, विसर्जन झालं, मग आले ते हृदयावर दगड ठेवुन उपमुख्यमंत्री म्हणून आले.”
भाजपने दिलेली आश्वासने पाळली नाहीत-
उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही पाच वर्षे भाजपसोबत होतो, मग हे शिंदे गटाचे लोक अशोक चव्हाणांना कसे भेटले, याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला आहे. भाजपने आम्हाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आमच्यासोबत सरकारमध्ये असताना अजित पवार माझ्या शेजारी बसायचे. पण त्यांनी कधीच माझ्याकडून माईक हिसकावून घेतला नाही. माझे उत्तर त्यांनी कधी कानात सांगितले नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मान दिला. भाजपने गुलामगिरी करण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना त्यांची जमीन दाखवायची आहे.”
देश हुकुमशाहीकडे चालला आहे-
“देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । मी रुग्णालयात होतो तेव्हा कटाप्पा कट करत होते; ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात
- Eknath Shinde | “… म्हणून मला भाषणापुर्वी नतमस्तक व्हावं लागलं”, उद्धव ठाकरें प्रमाणे नतमस्तक झालेल्या एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “बाप चोरणारी औलाद यांची…”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
- Dasara Melava | उद्धव ठाकरे कडाडले! केंद्रापासून राज्यातील नेत्यांवर घणाघात, भाषणातील प्रमुख मुद्दे वाचा…
- Shivsena । “…म्हणून मी महाविकास आघाडी केली होती”; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
