Share

Uddhav Thackeray | “बाप चोरणारी औलाद यांची…”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा साजरा होत आहे. सकाळपासूनच संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक यायला सुरुवात झाली होती. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहे. मात्र आज संध्याकाळी कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार यावरूनच खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या बापाच्या नावावर मतं मागायला काय होतंय? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. यांची बाप चोरणारी औलाद असल्याची जहरी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

पाकव्याप्त काश्मीर घेऊन दाखवा, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू

पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन, लेह-लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे गद्दार कशाला हवेत. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय? पण तिकडे शेपट्या घालायचे आणि इकडे येऊन पंजे काढायचे ही काय मर्दुमकी आहे का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

कोंबडीचोरांवर, बापचोरांवर या मेळाव्यात जास्त नाही बोलायचं

कोंबडीचोरावर, बाप चोरांवर या मेळाव्यावर जास्त बोलायचं नाही. या व्यासपीठाला एक अर्थ आहे, पावित्र्य आहे. ही सगळी लोकं आपल्यासाठी आले आहेत. शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!