मुंबई : बंड करत शिवसेनामध्ये फुट पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पहिला मेळावा आहे. तर शिवसेना पक्षाचा परंपरा असलेला दसरा मेळावा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर घेत आहेत. दोन्ही मैदानांवर एकाच वेळी दसरा मेळावे पार पडत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, भषणापुर्वी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरें प्रमाणेच नतमस्तक झाले.
एकनाथ शिंदे झाले नतमस्तक :
राज्याच्या काना कोपऱ्यातून अनेक लोक येथे आले आहेत, काही लोक कालपासूनच आले आहेत, तर काही पाहटेच बीकेसीवर दाखल झाले, त्यामुळे मला तुमच्या भावा समोर नतमस्तक व्हावं लागलं असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी देखील मंचावर पोहचताच नतमस्तक झाले होते. यावेळी डाॅक्टरांनी परवानगी दिली नसली तरी मी झुकलो आणि झुकल्या शिवाय पुढे जाणारही नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकून सांगितलं होतं.
उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण :
काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर स्पष्टीकरण देत असताना, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. असं स्पष्टीकरण ठाकरेंनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Dasara Melava | उद्धव ठाकरे कडाडले! केंद्रापासून राज्यातील नेत्यांवर घणाघात, भाषणातील प्रमुख मुद्दे वाचा…
- Shivsena । “…म्हणून मी महाविकास आघाडी केली होती”; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
- Rahul Shewale | “एनटी रामाराव यांच्याविरोधात जावयाने बंड केला, तेव्हा…”, राहुल शेवाळेंचा घणाघात
- Sushma Andhare । नारायणराव, सोनिया गांधींच्या पायावर १० वर्ष लोटांगण घातली, अन् तुम्ही हिंदुत्वावर बोलावं?; सुषमा अंधारेंचा आक्रमक सवाल
- Ambadas Danve | “ठाकरेंच्या बळावर तुम्हाला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही “; दानवेंचा शिंदे गटाला इशारा


