🕒 1 min read
मुंबई : शिवसेना कुणाची? या प्रश्नावर राजकीय आणि कायदेशीर लढाई सुरू असताना आता दसरा आला. दशकांच्या जुन्या मेळाव्याच्या परंपरेमुळे पक्षासाठी हा दिवस खास असला तरी दोन गटांमुळे समीकरणे बदलली आहेत. हे प्रकरण भारताच्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असले तरी, मुंबईतील दोन मैदानांवर होणार्या दोन सभा अनौपचारिकपणे ‘खरी शिवसेना’ कोणती हे ठरवतील. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला. केंद्रापासून राज्यातील नेत्यांवर त्यांनी हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे जाणून घेऊया…
- देवेंद्र फडणविसांना कायद्याच कळतं…. मी टोमणा मारत नाही, तारिफ करतोय. जाताना म्हणाले, पुन्हा येईन, मग दीड दिवसासाठी आले, विसर्जन झालं, मग आले ते हृदयावर दगड ठेवुन उपमुख्यमंत्री म्हणून आले.
- कोण बंदुक चालवतंय, कोण हातपाय तोडण्याची भाषा करतय… हा कायदा आहे का? रायगडच्या बबन पाटलांना त्रास देत आहेत, मडवींना तर पोलिस धमकी देतात, महिला भागिनींना त्रास देतात.
- एकही माणूस भाड्याने आणला नाही… तासाची बोली लावुन आणलेला नाही. दिव्यांग आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, माता भगिनी आहेत… कुणालाही विचारा.
- ग्रामपंचायतीत देखील सदस्यांना गपगुमान जा नाहीतर केस काढण्याची धमकी देतात. सलुन काढलं आहे का?
- सगळं दिलं आता शिवसेना प्रमुख व्हायचंय…. निदान स्वत:च्या वडिलांचा विचार करायचा, म्हणतील काय दिवटा जन्माला आला आहे, माझ्याजागी दुसर्याच्या वडिलांच नाव लावतो.
- रुग्णालयात होतो, शरीर निश्चल झाल होत तेंव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती ते कटाप्पा कट करत होते, त्यांना वाटलं हा परत उभा राहणार नाही. पण ते विसरले हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आई जगदंबा पाठीशी आहे.
- आनंद दिघे आजपर्यंत नाही आठवले… आता आठवले कारण ते येऊन बोलु शकणार नाहीत. पण दिघेजी निष्ठावंत होते. जाताना देखील भगव्यातुन गेले.
- अरे पाकिस्तानावर जाऊन जिनांच्या थडग्यावर जाऊन मस्तक टेकवणार्यांची तुम्ही अवलाद, कश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापाई मुफ्तींबरोबर युती करणारे तुम्हीं आम्हांला शिकवणार?
- भाजपवाल्यांकडून हिंदुत्व शिकण्याची मला गरजच नाही. भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्वाची सोडली अस नाही.
- गद्दार… होय गद्दारच!, मंत्रीपदाची खुर्ची जाइल परंतु गद्दारीचा कपाळावरील शिक्का आता पुसला जाणार नाही.
- अडीच अडीच वर्षाचा शब्द होता हे मी आई वडिलांची शपथ घेऊन, शिवरायांच्या साक्षीने सांगतो. जे आत्ता केलत ते तेंव्हा का मानाने केल नाहीत?
- अरे पाकिस्तानावर जाऊन जिनांच्या थडग्यावर जाऊन मस्तक टेकवणार्यांची तुम्हीं अवलाद, कश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापाई मुफ्तींबरोबर युती करणारे तुम्ही आम्हांला शिकवणार?
- फक्त गाईवर काय बोलता? महागाईवर बोला… पण त्या वेदना तुम्हांला जाणवु नयेत म्हणून इतर मुद्यावर बोलायचं… भरकटवायचं. हृदयात राम हवा परंतु हाताला कामही हव.
- भाजपवाल्यांकडुन हिंदुत्व शिकण्याची मला गरजच नाही…. भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्वाची सोडली अस नाही.
- एका अर्थी झाल ते बर झालं, बांडगुळ गेली. पण मुळ इकडे रुजलेली आहेत. कोणीतरी म्हणालं, त्यांना बांडगुळ सेना म्हणा, पण मी सेना शब्दाचा अपमान करू इच्छित नाही.
- माझ्यासोबत निखार्यावरुन चालण्याची तुमची तयारी आहे का? ही जी तुमच्यात आग आहे त्या वणव्यात गद्दार भस्म होतील. तुम्हीं साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हांला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.
- औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कॉंग्रेस – राष्ट्रवादी सोबत सरकार असताना केले. प्रस्ताव देताच पूढच्या क्षणी त्यांनी होकार दिला. मग काय आम्हीं हिंदुत्व सोडलं? शेतकर्यांची कर्जमुक्ती आम्हीं केली.
- सर्व देशप्रेमींनी एकत्र येण्याची गरज आहे.
- जर समोर अतिरेकी असेल, त्याच्या हातात स्टेनगन असेल तर आपल्याही हातात असायलाच हवी.
- मोहन भागवत मशिदीमध्ये जाऊन आले मग हिंदुत्व सोडले का? ते संवाद करायला गेले. मुसलमानाबरोबर ते बोलले तर चालतं पण आम्ही काँग्रेस बरोबर गेलो तर हिंदुत्व सोडले?
- अमित शाहजी आम्हांला जमीन दाखवाच, पण ती पाकव्याप्त जमीन एक फुटाची तरी आणून दाखवा. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे पंजे दाखवायचे, हे काय कामाच?
- मोहन भागवतांनी आज महिला शक्तीबद्दल भाष्य केले. अंकिता भंडारी ही देखील महिला आहे. तिच्या आईने आक्रोश केला, तिच्या मारेकर्यांना फाशी द्या. ती देखील महिलाच ना?
- आरएसएसचे होसाबाले यांच मी अभिनंदन करतो. तुम्ही संघाला आणि भाजपला आरसा दाखवला.. आता तरी सुधारणा होईल अशी आशा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । “…म्हणून मी महाविकास आघाडी केली होती”; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
- Rahul Shewale | “एनटी रामाराव यांच्याविरोधात जावयाने बंड केला, तेव्हा…”, राहुल शेवाळेंचा घणाघात
- Sushma Andhare । नारायणराव, सोनिया गांधींच्या पायावर १० वर्ष लोटांगण घातली, अन् तुम्ही हिंदुत्वावर बोलावं?; सुषमा अंधारेंचा आक्रमक सवाल
- Ambadas Danve | “ठाकरेंच्या बळावर तुम्हाला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही “; दानवेंचा शिंदे गटाला इशारा
- Rahul Shevale | “उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा…” ; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
