Share

तुकडे-तुकडे गँगचं दिल्लीच्या अशांततेला जबाबदार : अमित शहा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकी नंतर सर्वच राजकीय पक्षांनी आगामी काळात येणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. खासकरून भाजपने आतापासूनच दिल्लीत जनतेचे मन आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी विरोधी पक्षांकडून नकारात्मक राजकारण आणि भावना भडकवण्याचा आरोप केला आहे.

यावेळी शहा म्हणाले की, केजरीवाल सरकार विकास कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करत आहे. केजरीवाल फक्त जाहिराती देऊन लोकांना फसवत आहेत. जीवनात त्यांना फक्त विरोध करणे आणि धरणे आंदोलन करण्याशिवाय दुसरे कामचं येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधी पक्षांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल केली आहे. दिल्लीची शांतता भंग केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीच्या अशांततेला जबाबदार आहे. दिल्लीच्या जनेतेने त्यांना दंड दिला पाहिजे, असेही अमित शहा म्हणाले.

तर कॉंग्रेस सरकारच्या काळात कामच होत नव्हती. काँग्रेसच्या काळात पाच वर्षांत एक सरकार योजना बनवत असत. दुसऱ्या वर्षांत दुसरे सरकार त्यासाठी निधी मंजूर करत असत. तिसऱ्या 5 वर्षांत त्याचे भूमिपूजन केले जात आणि पुढच्या 5 वर्षांत काँग्रेस सरकार ती योजनाच विसरुन जात, असही अमित शहा म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!