🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया-भारतीय संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या डावात आघाडी मिळवूनही दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर गारद झाला होता.
परंतु या ऍडलेडमध्ये झालेल्या लज्जास्पद पराभवाचा बदला भारताने मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रहाणेच्या या नेतृत्वासाठी त्याचं देशासह क्रीडा विश्वातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
रहाणेच्या या कामगिरीनानंतर रहाणे आणि कोहली यांच्या नेतृत्त्वाची तुलना केली जाऊ लागली आहे. परंतु भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला त्यांची तुलना करणे अजिबात आवडलेले नाही.
याविषयी पीटीआयशी बोलताना सचिन म्हणाला की, ‘लोकांनी रहाणे आणि कोहली यांची तुलना करू नये. रहाणेचे व्यक्तिमत्त्व कोहलीपेक्षा खूप वेगळे आहे. बॉक्सिंग डे कसोटीत त्याचा हेतू आक्रमक फलंदाजी करण्याचा होता. मला सर्वांना आठवण करून द्यायची आहे की, रहाणे आणि कोहली हे दोघेही भारतीय आहेत आणि ते भारतीय संघाकडून क्रिकेट खेळतात. कोणताही व्यक्ती भारत देशापेक्षा जास्त मोठा नाही. आपला क्रिकेट संघ आणि देश यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कुणीही नाही.’
महत्वाच्या बातम्या
- सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी
- कर्तव्य बजावताना अपंगत्व आल्यास आता सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना “अपंगत्व भरपाई” मिळणार
- चाहत्याने भरलं रोहित, गिल आणि पंत यांच्या जेवणाचं चक्क ‘इतकं’ बिल
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
