Share

अमित देशमुख यांचा औरंगाबादेत ‘हेल्मेट’ पायंडा, काँग्रेसच्या सायकल रॅलीमध्ये झाले सहभागी

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशानुसार राज्यभरात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात राज्य पातळीवरील नेते सहभागी होत आहेत. औरंगाबादेतही वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्त्वात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अमित देशमुख यांनी सायकल चालवत केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध केला. मात्र, सायकलवर सवार होतांना देशमुख यांनी घातलेल्या हेल्मेटमुळे चांगलीच चर्चा रंगली होती.

औरंगाबाद उच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मे महिन्यात औरंगाबाद पोलिसांना दिले होते. या मुद्यावरुन उच्च न्यायालयाने औरंगाबाद पोलिसांची कानउघडणी केली होती. त्यावर केवळ आदेश काढत औरंगाबाद पोलिसांनी हा विषय गुंडाळून ठेवला. वास्तविक या निर्णयाला सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा विरोध आहे. त्यामुळे राज्य सरकार असो की, पोलीस प्रशासन, हेल्मेट सक्तीकडे गांभीर्याने पाहत नाही.

असे असले तरी औरंगाबाच्या सायकल रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मात्र, हेल्मेट घालत सहभाग नोंदवला. यामुळे उपस्थितांमध्ये हेल्मेट सक्तीची चांगलीच चर्चा रंगली होती. वास्तविक नियम करुन नाही तर, प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर केल्यास त्याचा फायदा होईल. मात्र, त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. या सर्वात महत्त्वाच्या ठरतो तो अमित देशमुख यांनी घातलेला हेल्मेटचा पायंडा.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!