औरंगाबाद : पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोजगार व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांची उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आला. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुकता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिल्याने शिंदे गटाला विचार पडला आहे. तसेच यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाची पुन्हा चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौराः
शिंदे गटाने केलेला बंड मोडून काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मागील महिन्यांपासून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे.
औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. यावेळी ज्या ठिकाणी आमदार शिंदे गटात आले तिथेच आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळावा घेतला. त्यामुळे पैठणमध्ये ही आदित्य ठाकरे यांची जोरदार सभा झाली होती. सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी देखील जोरदार तयारी केली होती. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमली होती. मात्र भुमरे यांच्या कार्यक्रमालाकेवळ शंभर लोकांची गर्दी पाहून जमलेल्यांना आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यातील गर्दी आठवत आहे.
संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमामुळे एकच चर्चाः
दरम्यान, शिवसेने समोर सध्या बंडखोर आमदारांच्या वर्चस्वामुळे मोठं आव्हान आहे. निम्म्यापेक्षा जास्त शिवसेना आमदार शिंदे गटात गेल्याने गटाला पुन्हा पहिल्यापासून झटावं लागणार आहे. अशातच शिंदे गटाने दोन आमदारांना पदं दिले याच आमदारांची जास्त चर्चा आहे. मात्र संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमामुळे एकच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Vinayak Raut | दसरा मेळाव्यावरून आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली, नीच राजकारण सुरूये; राऊत आक्रमक
- Dussehra Melava | शिवसेना नंतर आता दसरा मेळावा नेमका कोणाचा? उद्धव ठाकरे गट की एकनाथ शिंदे गट?
- Sambhaji Brigade | नवीन आहोत पण गाफील नाही, तुम्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी दहशत का? – संतोष शिंदे
- Rajan Salvi। “मरेपर्यंत मी शिवसेना, उद्धव ठाकरेंसोबतच राहणार”; राजन साळवींनी पुन्हा ठणकावून सांगितले
- Hemant Soren | राजकीय संकटामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आमदारांसोबत निघाले ‘या’ ठिकाणी


