Share

Dussehra Melava | शिवसेना नंतर आता दसरा मेळावा नेमका कोणाचा? उद्धव ठाकरे गट की एकनाथ शिंदे गट?

Published On: 

मुंबई : मुख्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून यंदा पहिल्यांदाच भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरच हा मेळावा पार पडावा म्हणून शिवाजी पार्क मैदान मिळवण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे दसरा मेळावा साठी मैदान मिळवं म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांना लक्ष घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा साठी महापालिकेकडे केला अर्जः

उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासक इकबाल सिंह सहल यांच्याशी संवाद साधून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याची विनंती केली. मात्र सिंह यांनी अद्याप परवानगीसाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात असून एकनाथ शिंदे गटाला परवानगी मिळावी यासाठी पडद्यामागे हलचाल सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे देखील शिवाजी पार्क मिळवण्याच्या तयारीतः

येत्या 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा कोण घेणार? यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावा म्हणून महापालिकडे अर्ज केला असताना महापालिकेकडून परवानगीसाठी अद्याप उत्तर आलेलं नाही. त्यामुळे महापालिका उद्धव ठाकरे गटाला की एकनाथ शिंदे गटाला परवानगी देणार याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्ह दिसत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे देखील सक्रिय झाले आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!