Share

Sambhaji Brigade | नवीन आहोत पण गाफील नाही, तुम्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी दहशत का? – संतोष शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुणे दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड हे दोन पक्ष पुढील निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली असून इतर पक्ष या मुद्द्यावरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांना लक्ष्य करत आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सत्ताधारी पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपला संभाजी ब्रिगेडची एवढी भीती का वाटते? संतोष शिंदे यांचा सवाल-

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीमुळे भाजपची झोप उडाली आहे. भाजपला संभाजी ब्रिगेडची एवढी भीती का वाटते?, असा खोचक सवाल करून संतोष शिंदे यांनी भाजपला सडकून प्रत्युत्तर दिलं आहे. संतोष शिंदे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही-

पुढे ते असेही म्हणाले की, एका दिवसाचे एवढे टेन्शन तुम्हाला आले आहे. परंतु जेव्हा आम्ही तुमच्यासारख्या जातीयवादी, मनुवादी विचारांच्या विरोधात आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू त्यावेळी तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही आधीच जवळ झेंडू बाम ठेवा.

सतत नशेमध्ये बोलून चालत नाही-

दरम्यान भाजप संभाजी ब्रिगेडला किती डिपॉझिट जप्त झाले किती टक्के मतदान पडले असे सवाल विचारत होते या प्रश्नांना प्रत्युत्तर करताना संतोष शिंदे म्हणाले की पहिल्यांदाच निवडणुकीत बहुमताची अपेक्षा कशी काय करता. महाराष्ट्रात सत्तेत यायला तुम्हाला किती वर्ष लागली, सतत नशेमध्ये बोलून चालत नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!