🕒 1 min read
मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्रा यांना जामीन दिला आहे. राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पत्रकारांनी शिल्पाला राज कुंद्राबाबत विचारलेल्या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तर सध्या चर्चाचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिल्पाला राजविषयी प्रश्न विचारल्यानंतर “मी राज कुंद्रा आहे का? मी त्याच्यासारखी दिसते का? मी कोण आहे?”,असे प्रश्न विचारत याविषयावर मौन बाळगले. मात्र हा व्हायरल हा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं जात आहे.
पतीच्या अटकेनंतर देखील शिल्पा खंभीर राहत सर्व परिस्थितीवर मात करत असल्याचे दिसली. या काळात तिला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र याचा कोणताही अधिक परिणाम तिने तिच्या आयुष्यावर घडू दिला नाही. सध्या तिने पुन्हा एकदा उत्साहात कामाला सुरवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरएसएसबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जावेद अख्तरांना न्यायालयाचा दणका
- रावसाहेब दानवे ठेकेदाराला त्रास देत असल्याचे खुद्द मला नितीन गडकरी यांनीच सांगितले, खैरेंचा गौप्यस्फोट!
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- पहिला प्रयत्न वाया, आता अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी आता दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु
- करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
