Share

लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !

Published On: 

अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचे दर्शन तसे त्यांच्या मतदारांना दुर्मिळच असते. ही निवडणूक ते ती निवडणूक सोडली तर लोखंडे मतदारसंघात फिरकत देखील नाहीत अशी त्यांची ख्याती आहे. म्हणूनच त्यांच्यावर नेवासा येथील आढावा बैठकीच्यावेळी शाई फेकण्याचा प्रयत्न झाला होता. यावरून चिडलेल्या लोखंडेंनी आता एक बेताल वक्तव्य केले आहे.

सदाशिव लोखंडे मतदारसंघात आभावानेच दिसतात आणि लोकांना भेटत नाहीत, अशी त्यांच्याविरूद्ध मागील कार्यकाळापासूनची तक्रार आहे. त्यांच्यावरील या टीकेला त्यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले, ‘गावचे सरपंच लोकांना रोज भेटू शकतात. मी सरपंच नव्हे तर खासदार आहे. रोज भेटत नसलो तरी मतदारसंघासाठी माझी कामे सुरूच असतात.’ कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शिर्डीत आले असता खासदार लोखंडे पत्रकारांशी बोलत होते.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोखंडे निवडून आलेले असले तरी त्यांचे वास्तव्य मुंबई आणि दिल्लीतच असते. त्यामुळे मागील कार्यकाळापासून ते भेटत नसल्याच्या मतदारसंघातून तक्रारी होत असतात. कोरोनाच्या संकटातही सुरवातीच्या काळात ते भेटायला आले नसल्याची लोकांची तक्रार आहे. यावरूनच नेवासा येथील आढावा बैठकीच्यावेळी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला होता. या टीकेबद्दल विचारले असता लोखंडे म्हणाले, ‘लोकसभेचे अधिवेशन, इतर बैठका यासाठी वर्षातील सुमारे दोनशे दिवस दिल्लीतच जातात. उरलेल्या काळात मतदारसंघासाठीची कामे सुरू असतात. मी भेटलो नाही, याचा अर्थ काम करीत नाही, असा होत नाही. माझे काम सुरूच असते. गावचा सरपंच रोज भेटू शकतो, मी सरपंच नाही, खासदार आहे. सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!