Share

पार्सलची प्रतिक्षा नको… सरळ दुकानासमोर गर्दी करत तळीराम करताहेत खरेदी

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र दारूच्या दुकानांसमोर नागरिक मोठी गर्दी करत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. या गर्दीत कोरोना नियमांचे देखील उल्लंघन होत आहे. पार्सलची सुविधा उपलब्ध असली तरी तेवढाही दम निघत नसल्याने मद्यप्रेमी थेट दुकानांबाहेर गर्दी करत असल्याचे चित्र तुळजापुरात बघायला मिळत आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे छोट्या- छोट्या दुकानांवर कारवाई करणारे पोलिस, महसूल तसेच नगरपालिका अधिकारी दारूच्या दुकानांवर मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस, महसूल तसेच नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी शहरात फिरत असून छोटे व्यावसायिक, फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत दंडाची वसुली करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये सकाळी ७ ते ११ या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी मुभा दिली. विशेष म्हणजे दारू दुकाने अत्यावश्यक सेवेत असल्याने या कालावधीत खुली आहेत. मात्र, सकाळी ११ ची मुदत संपल्यानंतरही दारू दुकानातून विक्री सुरू आहे. पार्सल सेवा असली तरी देखील दुकानात गर्दी करत असल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. मात्र याकडे उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!