बीड : बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी अचानक काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. चाक्रीवादाळासह झालेल्या या पावसाने जिल्ह्याला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेच त्याच सोबत अनेकांचे घरे जमीनदोस्त या अवकाळी पावसामुळे झाले आहेत. नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
या अवकाळी पावसामुळे नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहे. तसेच भर नद्यांना पूर आला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील अनेक भागात आज दुपारनंतर अवकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील आवरगाव, पांगरी, हसणाबाद, भोगलवाडी, थेटेगव्हाण येथील अनेक नद्यांना पुर आला आहे. तर नद्या, नाल्या, ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. धारूर तालुक्यातील आवरगाव, पांगरी, तांदळवाडी, हसनाबाद या गावांसह परिसरात शनिवारी दुपारी चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. यात मोठ्या प्रमाणात केळी, मोसंबी व अन्य फळांच्या बागांचे, तसेच घरांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसासह चक्रीवादळात आवरगाव येथील पाच घरांचे मोठे नुकसान झाले.
धारूर घाटातील तलाव प्रकल्प अर्धा भरला आहे तर वादळी वादऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतपिकांसह आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावेळी अनेकांच्या घरांवरील पत्रे देखील उडाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी संदर्भात अद्याप माहिती समोर आली नाही. दरम्यान, उन्हाच्या कडक पाहऱ्यात झालेल्या जोरदार पावसाने गर्मीपासून होणाऱ्या अंगाच्या लाहीलाहीला थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र भर उन्हाळ्यात झालेल्या पावसामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आवरगाव, तांदुळवाडी व परिसरामध्ये अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. आवरगावमध्ये सौदागर नखाते यांच्या घरावर पिंपळाचे झाड मोडून पडले. तसेच सुंदर दिगंबर जगताप यांचे घर वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. अंकुश लोखंडे यांच्या अंगावरती भिंत कोसळली असून ते जखमी झाले आहेत. तर अन्य काहीच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरामध्ये पावसाचे पाणी साचले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- “माझा डॉक्टर” म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावे – उद्धव ठाकरे
- 2021-22 मध्ये गहू खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 49 टक्के वाढ; रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘बंगाल जिंकण्याच्या आग्रहामुळे देश उद्ध्वस्त’, ममतांचा मोदींवर हल्लाबोल
- पार्सलची प्रतिक्षा नको… सरळ दुकानासमोर गर्दी करत तळीराम करताहेत खरेदी


