Share

किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी- सुजय विखे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर उठवावी अशी विनंती अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना निवेदनातून केली आहे.

खा.विखे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी जेणेकरून कांद्याची निर्यात व कांद्याचा भाव नियंत्रणात राहील. अशा प्रकारे तोडगा काढून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती विखे यांनी निवेदनात केली आहे.

तसेच केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेला एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून कांद्याच्या किमती स्थिर कराव्यात. मात्र हा कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी खा.सुजय विखे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!