🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात सोमवारी तब्बल ४७ हजार २८८ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्यामुळे स्थिती ही अधिकच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.
राज्यात फक्त शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल. या निर्णयाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.
दरम्यान, राज्यात हा आकडा अधिक वाढण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढून स्थिती भयानक होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरु करण्यात आली असून दररोज विक्रमी लसीकरण केले जात आहे. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत असल्याने लसीकरणावर भर दिले जात आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray has written to the Hon’ble Prime Minister Shri @narendramodi to further lower the age group eligible for vaccination to 25years old to curb the intensity of the rising cases in the state. pic.twitter.com/YWwebaYW9X
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 5, 2021
मात्र, सध्या फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. तर, महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता २५ वर्षांपुढील व्यक्तींना लस यज्ञाची मुभा केंद्र सरकारने द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच, महाराष्ट्रासाठी मुबलक लसींचा साठा देखील उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता, २५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकार कधी देणार ? याकडे राज्यच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राठोड गेले, देशमुख गेले, आता अनिल परबांचा नंबर : किरीट सोमय्यांचे भाकीत
- ‘आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांना पाहिले गेले, मात्र भाजपमुळे…
- ऐनवेळी पोटापाण्याची उपासमार; स्विगीसह झोमॅटो देखील अचानक बंद !
- राज ठाकरेंचे भाकीत पुन्हा खरे ठरले, फटाक्याची माळ लागण्यास सुरवात झाली !
- शरद पवारांचा ‘पी.ए’ ते थेट महाराष्ट्राचा गृहमंत्री… दिलीपराव वळसे पाटील यांचा थक्क करणारा प्रवास !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
