सोलापुर : देशभरातील शेतकरीवर्ग सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. सरकारचे धोरण, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव न मिळणे अश्या अनेक समस्यांचा सामना बळीराजा करत आहे. सर्व बाजूने कोंडी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आल्याचे देखील अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
आता शेती काही परवडत नाही असं सर्रास बोललं जात त्यामुळे अशात आम्हाला गांजा लावायला परवानगी द्या असं खासगीत बोललं जात. मात्र, आता सोलापुरातील एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून दोन एकर गांजा लावण्यास परवानगी द्या अशी मागणी केली आहे.
या शेतकऱ्याचे नाव अनिल पाटील असे आहे. शेतकऱ्याची शिरपूर ता. मोहोळ येथे स्वतःच्या मालकीची 2 एकर जमीन आहे याच 2 एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. कोणतेही पीक लागवड केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्यामुळे त्याला त्याची शेती तोट्यात करावी लागत आहे असल्याचे कारण सांगत त्याने ही अजब मागणी केली आहे.
पिकाला कवडीमोल भाव मिळत आल्यामुळे शेती करणे कठीण झालं. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखाण्याला ऊस गाळपासाठी दिला असता, त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही, त्यामुळे गांजाला भाव असल्यामुळे या शेतकऱ्याने दोन एकर गांजा लागवड करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे मागणी केली आहे.
15 सप्टेंबर पर्यंत लेखी परवानगी द्यावी अन्यथा 16 सप्टेंबर पासून शेतकरी आपल्याला प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे असे गृहीत धरून गांजा लागवड सुरु करणार आहे अशी माहिती शेतकऱ्याने दिली आहे. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यास प्रशासन जबाबदार राहील असेही या शेतकऱ्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मर्द को दर्द नहीं होता’, उपचारानंतर अभिषेकने शेअर केला फोटो
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची घसरण, ‘या’ खेळाडूने दिला धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

