🕒 1 min read
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (actor Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आर्यन खान (Arbaaz Merchant) आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट हे मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी सहआरोपी आहेत. हे दोघे मित्र सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर ते दोघेही एकमेकांना भेटू शकत नाही, अशी अट न्यायालयाने जामिनाच्या अटींमध्ये घातली आहे. त्यामुळे आता अरबाज मर्चंट हा कोर्टात (court) ही अट काढून टाकण्यासाठी अर्ज करणार आहे.
या जामीन अर्जात दिलेल्या अटीनुसार आर्यन खान आणि अरबाज मर्चंट हे दोघेही या प्रकरणातील सहआरोपी आहेत. त्यामुळे ते एक दोघेही एकमेकांना भेटू शकत नाही. त्यासोबतच या दोघांनाही एकमेकांशी कोणताही संवाद किंवा संभाषण करता येणार नाही. जर या अटींकडे दुर्लक्ष केले तर आर्यन आणि अरबाज या दोघांचाही जामीन रद्द केला जाईल, असे कोर्टाने सांगितले होते. अरबाज खान हा आर्यन खान आणि सुहाना खानचा मित्र आहे. तो अभिनेता असून इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. बऱ्याचदा स्टारकिड्ससोबत तो पार्ट्यांमध्ये दिसला आहे.
https://www.instagram.com/p/CXlMOqZsSeH/?utm_medium=copy_link
आर्यन आणि अरबाज जवळपास गेली पंधरा वर्षे मित्र असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबाज मर्चंट अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया एफला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कोर्टाच्या या अटीमुळे आर्यन आणि अरबाज गेले अनेक महिने एकमेकांना भेटलेले नाही. त्यासोबत त्या दोघांचाही एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही. त्यामुळे मला आर्यनला भेटण्याची परवानगी द्यावी, यासाठी अरबाज मर्चंट लवकरच कोर्टात अर्ज करणार आहे.
दरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या (NCB) ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. त्यानंतर जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर सुटका करण्यात आली. आर्यन खानसह या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या. आता मात्र आर्यन खानला भेटण्यासाठी अरबाज मर्चंट न्यायालयात अर्ज करणारत्यामुळे कोर्ट आता या अर्जावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘ती’ जागा आयुक्त पांडेय यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विकली; आंबेडकरवादी समितीचा आरोप!
- “बिन बुलाये पाकिस्तान्यांसोबत बिर्याणी खायला भीती नाही वाटत पण..” भाई जगताप यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा
- राज्यात कोरोना वाढतोय! लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंची महत्वाची माहिती
- परीक्षा घोट्याळ्यात अटक असलेल्या तुकाराम सुपेसह ११ जण कोरोना पॉझिटीव्ह
- अचानक लाहोरला उतरले तेव्हा जीवाला धोका नव्हता आणि शेतकऱ्यांमध्ये अडकले तर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
