Share

राज्यात कोरोना वाढतोय! लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंची महत्वाची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाने राज्यात पुन्हा कहर केला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा संपुर्ण लॉकडाऊन लागणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

“७०० मेट्रीक टन ऑक्सिजन आणि ४० टक्के बेड जेव्हा लागतील तेव्हा लॉकडाऊन लागेल पण आता तशी परिस्थिती अजिबात नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली म्हणून घाबरण्याच कुठलही कारण नाही. कारण हॉस्पिटलमध्ये १० ते १५ टक्के बेड फक्त लागले आहेत. मुबलक बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील कुठेही वाढलेली नाही. मृत्यूदर देखील कुठेही वाढला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कुठलेही कारण नाही”, असे  राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले, “नागरिकांनी काळजी घ्यावी, आपण कोरोना संदर्भातील नियम पाळले नाहीत आणि आपण बेभान पद्धतीने वावरत राहीलो तर आपल्याला निर्बंध वाढवावे लागतील. जीवनावश्यक गोष्टी सोडता बाकीच्या गोष्टींना रोख लागला पाहीजे. मुंबई सारख्या शहरात मुख्यमंत्र्यांनी सुचना केली तर रात्री ११ ते सकाळी ५ निर्बंध लावता येतील. नाईट कर्फ्यूसाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवला आहे.”

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!