पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली होती. तुकाराम सुपेला (Tukaram Supe) पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. आता सुपेसह एकूण ११ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
परीक्षा घोटाळ्यात अटक असलेलले आरोपी तुकाराम सुपेसह ११ अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आरोपी तुकाराम सुपे, शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण झाली आहे. यांच्यासोबत सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांना सौम्य लक्षण आढळून आली आहेत.
पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर त्याच्या घरी पहिला छापा टाकला होता. त्यावेळी सुपेच्या घरातून ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचीही माहिती मिळाली होती, याप्रकरणी पुणे पोलिसांनी १ कोटी ५८ लाखांहून अधिक रक्कम सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींचे ढोंग जनतेसमोर आले’, सचिन सावंत यांचा टोला
- अभिनेत्री स्वरा भास्करची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; पोस्ट झाली व्हायरल
- पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला- नाना पटोले
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

